top of page

आम्हा बद्दल...

                                              मी श्री.दिपक पोपटराव कळंबे, www.dhorsamaj.tk मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो.

माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास मी मुळचा सिन्नर ( नाशिकचा )श्री.वसंतराव रामचंद्र केळगंद्रेसाहेब.(उप अध्यक्ष वीरशैव कक्कय्या समाज विकास मंडळ पुणे) यांचा भाचा व श्री.पोपटराव फकिरा कळंबेसाहेब.(कनिष्ठा अभियंता)  यांचे  सुपुत्र.
माझ्या घरातील माझे मामा व माझे वडील हे अत्यंत धाडशी व दोघांना सुद्धा समाजकार्याची नितांत आवड त्यामुळे पूर्वीपासून लोकांसाठी काहीतरी करुन दाखवायची माझी इच्छा होती व माझी ही इच्छा पूर्ण झाली ती www.dhorsamaj.tk हि वेब साईट तयार करून.
मी स्वतः पुढाकार घेवून ठरवले व तेव्हापासून खऱ्याअर्थाने लग्न जमवण्याच्या कार्याला सुरुवात झाली.

 "आहो दिपक सर  मुलगा लग्नाचा आहे त्याला देखणी व अनुरुप मुलगी बघा हो किंवा माझी मुलगी लग्नाची आहे तीला सुस्थापीत मुलगा बघून द्या हो'' या पालकांच्या आग्रहास्तव मी ही स्थळे सुचवत गेले व त्यातूनच लग्न जमत गेली. त्यामुळे हळूहळू याची चर्चा शहरात व समाजात पसरत गेली.

हल्लीच्या काळात लग्न जमवणे ही फारच कठीण गोष्ट बनली आहे याचे मुख्य कारण म्हणजे लोकांच्यात प्रचलीत असलेल्या चुकीच्या कल्पना आत्ताच्या वैज्ञानिक युगात लोकांमध्ये (पालकांमध्ये) अनेक वेड्या कल्पना रुढ आहेत. उदा: मंगळ, कुंडली जमणे, राशी, कुळी इ. यामुळे पालक हाताशी आलेले चांगले स्थळ सोडून देतात.

तसेच सध्याच्या युगात मुले व मुली फारच शिकल्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या आपल्या जोडीदारा बददलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यासाठीच पालकांना व मुलामुलींना योग्य मार्गदर्शन करण्याच्या हेतूने मी वेळोवेळी वेब साईटचा  माध्यमातून माझे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत असतो. तसेच माझ्या अद्यावत वेबसाईटमुळे स्थळांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत.
 

सुसंस्कृत ढोर समाजाच्या बांधणीस आपण सारे मिळून हातभार लावूया...!

 

मानवाचा आयुष्यातील  वाटचाल सदैव सुखी जीवनाचा दिशेने सुरु असते.आई वडील अपत्याचा उजवल भवितव्यसाठी सदैव प्रेमाची पाखरण करत असतात. मुलं शिकतात..मोठी होतात.. आपल्याला आधार देतात .मग सर्वानाच प्रतीक्षा लागते ती  त्याच्या  लग्नाची' !​
जीवन तृप्त करणाऱ्या स्वप्नपुर्तीच्या अनमोल क्षणाची...!!​
लग्न म्हणजे आयुष्याचा नभांगणातील  एक सुंदर सोनेरी क्षण ! या मंगल प्रसंगी वधू- वराच्या  मनोमिलानाबरोबर दोन घराण्यमध्ये विश्वासाचे ,कृत्यान्नाचे  नाते निर्माण होते .​
आज विविध क्षेत्रात यशोशिखर गाठण्याचा निमित्याने ढोर समाज जगभर विस्तारित गेला त्यामुळे पूर्वीचा सोयरिक जुळविण्याच्या पद्धतीला नव्या आधुनिक पद्धतीची  गरज भासते आहे.​
तत्रनाची जोड घेऊन अत्याधुनिक पद्धतीने कार्यारीत असलेले आमच्या  वधू वर सूचक केद्रचे सभासद होऊन आपण ढोर समाजातील अधिकधिक स्थळापर्यंत  पोहचू शकता.साहजिकच तुमच्या मनपसंद स्थळांसाठी  तुमच्या समोर असतील अनेक सुयोग पर्याय .​​

आमची वेबसाईट www.dhorsamaj.tk ही आपणास कशी वाटली हे आम्हाला जरुर कळवावे व त्यात काही सुधारणा करणे जरुरी असल्यास त्या आम्हास आवश्यक कळवाव्यात आपल्या सुचनांचे कायमच स्वागत केले जाईल.
धन्यवाद !
                                                                                                                                                       
- श्री.दिपक कळंबे,

वेबसाईट बद्दल...
आमच्या असंख्य समाज बांधवच्या मागणीवरुन आम्ही आमची खास वेबसाईट www.dhorsamaj.tk सुरु केली आहे. यावरून आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आमच्या सभासदांच्या स्थळांची माहिती घेऊ शकता. तसेच आपण आपले नाव आमच्या वेबसाईटमार्फत नोंदवू शकता. यामुळे आपणास दरवेळी स्थळांच्या माहितीसाठी करावा लागणारा खर्च व वेळ नक्कीच वाचू शकेल.

bottom of page