top of page

* केंद्राचे नियम व अटी *​​

1.केंद्राचे कार्य ढोर समाजातील वधू-वरांसाठीच मर्यादीत राहील.​​

2.अनुरुप व योग्य स्थळांचे पत्ते व माहीती मिळण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.​

3.वराची / वधूची नोंदणी फ्री असेल. ही नोंदणी 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल. त्यानंतर पुन्हा मेंबरशीप् 'रिन्यु' करता येईल.​

4.प्रत्येक सभासदास नोंदणी क्रमांक देण्यात येईल. प्रत्येक वेळी केद्राशी संपर्क साधताना दिलेला नोंदणी क्रमांक आपल्याजवळ असणे किंवा आपल्याला तो माहीत असणे आवश्यक राहील. फोनवरुन स्थळांची माहिती घेताना नोंदणीक्रमांक सांगितल्याशिवाय स्थळांची माहिती मिळणार नाही.​

5.प्रत्येक सभासदाने उपवर/उपवधूचा फोटो देणे आवश्यक आहे. लग्न ठरल्यानंतर पत्र किंवा फोनद्वारे केंद्राकडे ताबडतोब कळवून नाव कमी करून घेणे​

6.सर्वांना सोयीचे व्हावे या दृष्टीने र्फॉर्म पूर्णपणे मराठीमध्ये अथवा इंग्रजीमध्ये भरलेला असावा. अपूर्ण भरलेल्या फॉर्मचा, तसेच सोबत फोटो पाठविलेला नसलेल्या फॉर्मचा विचार केला जाणार नाही..​

7.केंद्र दोन्ही पक्षाकरीता आत्मीयतेने व तत्परतेने काम करत असते. तरी सदस्यांनी कृपया आपल्या स्थळांची खरी माहिती केंद्राला पुरवावी.

8.विवाह केंद्रातर्फे वा स्वप्रयत्नाने जुळून आल्यास त्याची माहिती केंद्राला विनाविलंब कळवावी. कारण सदरची माहिती रेकॉर्डवर राहिल्यास विनाकारण संपर्कासाठी सभासदांचा वेळ वाया जाणार नाही.

9.केंद्रातून लग्न जमल्यास केंद्र सभासदाकडून कोणत्याही प्रकारच्या देणगीची अपेक्षा करणार नाही. याची कृपया सभासदांनी नोंद घ्यावी.

10.केंद्रातून घेतलेल्या स्थळांची व्यक्तिगत माहिती ही सभासदांनी आपल्या जबादारीवर घ्यावयाची आहे. भविष्यातील कोणत्याही समस्येस केंद्र जबादार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

11.नांव नोंदवल्यावर विवाह जमेलच किंवा अमुख दिवसातच जमेल याची कोणतीही जबाबदारी केंद्र वा संचालक घेणार नाहीत.

12.विवाहासंदर्भात पालकांनी तडजोडीची व योग्य आणि जलद प्रतिसाद देण्याची भूमिका ठेवावी. जेणेकरुन लग्न लवकर ठरण्यास मदत होईल.

13. केंद्रातर्फे सुचवलेल्या स्थळांना कृपया आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा.

14. केंद्रातून नेलेल्या माहीतींचा गैरवापर केल्यास त्याचे सभासदत्व कायमचे रद्द केले जाईल.

15.सदरची सर्व स्थळे पाहताना स्थळांचे नोंदणी क्रमांक घेणे फारच महत्वाचे आहे कारण केंद्राचे सर्व कामकाज हे सभासदांच्या नोंदणी क्रमांकाहूनच चालते.

16. सदरचे नियम मान्य असतील त्यांनीच आमच्या केंद्रात नाव नोंदणी करावी.

bottom of page