top of page

चला नाव नोंद्वूया….
अनुरुप जोडीदार शोधूया.......!!

​या ठिकाणी नाव नोंदविण्यासाठी आपली संपूर्ण माहिती बायोडाटा आणि तीन सर्वोत्तम फोटो आमच्या dhorsamaj@gmail.com/ kakkayasamaj@gmail.com वर पाठवावे.
माहिती पाठविताना ती सत्य असायला हवी यात ज्याचे नाव नोंदवायचे आहे त्याचे या अगोदर विवाह झाला आहे किंवा नाही याबाबत सत्य माहिती, घटस्फोट झालेला असल्यास कारण आणि त्याविषयीची संपूर्ण माहिती किंवा यागोदारील पती पत्नीचा मृत्यू झाला असल्यास त्याविषयीची संपूर्ण माहिती तसेच ज्याचे नाव नोंदवायचे आहे त्याचे  नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण,  शिक्षण, शारीरिक अपंगत्व असल्यास किंवा आजार असल्यास त्याची पूर्ण माहिती, नोकरी किंवा व्यवसाय वार्षिक उत्पन्न, आणि जोडीदार विषयक अपेक्षा तसेच
वडिलांचे नाव  वडिलांचे कुळ, वडिलांचे मुळगाव, वडिलांचा उद्योग,व्यवसाय किंवा नोकरी , वडिलांचा सध्याचा सविस्तर पत्ता, इमेल असल्यास उत्तम, आईचे नाव नोकरी व्यवसाय करत असल्यास त्याची माहिती, भावंडांची माहिती विवाहित भाऊ बहीण अविवाहित भाऊ बहीण  मामांचे नाव, मामांचे कुळ, मामांचे मुळगाव, वडिलांचा फोन नंबर , मोबाईल नंबर.
    वधु वर विवाहस्थळांची नाव नोंदणी ही एक वर्ष कालावधी साठी करण्यात येईल यासाठी वार्षिक रजिस्ट्रेशन फी
फ्री असेल संपूर्ण माहिती आल्यानंतर नाव नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर आपली माहिती आमच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात येईल.
    आमच्या कडे किंवा आमच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती ही संबधित विवाहस्थळाच्या पालकांनी दिली आहे अश्या संबंधित स्थळांशी नाते संबंध प्रस्थापित करण्याआधी आवश्यक इतर माहिती मिळवण्याची तसेच आमच्या कडील माहितीची सत्यता तपासण्याची जवाबदारी ही वधु वर पालकांचीच असणार आहे याची नोंद घ्यावी.​​​

bottom of page